Thursday, July 31, 2008

दारूच्या काही कविता (मला आवडलेल्या)

पिणे असतो आगळा ऊत्सव
त्याचा उरुस होऊ नये
प्यायल्यानंतर आपला कधी
वकार युनुस होउ नये


ग्लासी लागेल ते ढोसत असतो
पानी लागेल ते चरत असतो
जेंव्हा माझ बिल
कोणी दुसराच भरत असतो



मी तसा श्रध्दावान
श्रावण नेहमीच पाळतो
श्रावणात फक्त दारू पितो
nonveg मात्र टाळतो


SCOTCH प्यावी कोरी कच्ची
बर्फ नको , सोडा नको
ऊंच आभाळी उड़ण्यासाठी
पंख हवे ......... घोड़ा नको


आपला पेग आपण भरावा
दुसरयावर विश्वास ठेउ नये
आपला ग्लास, आपली बाटली
दुसरयाच्या हातात देऊ नये



घरी बसून दारू प्यायचे
खुप सारे फायदे असतात
hotel मध्ये बिल भरायचे
काटेकोर कायदे असतात



अस उगीच वाटत लोकांना
की दू:ख दारुत बुडून जात
दू:ख असत हलक हलक
अल्कोहोलसोबत उडून जात


तुला जायचच असेल तर निघून जा
जाण्यासाठी भांडू नको
प्यायची नसेल तर पिऊ नको
पण दारू अशी सांडू नको


पिऊन थोडी चढणार असेल
तरच पिण्याला अर्थ आहे
एवढी ढोसुन चढणार नसेल
तर अख्खा खंबा व्यर्थ आहे


आम्ही कधीच दारुमध्ये
दू:ख आमच बुडवत नाही
दारू नेहमी शुद्धच ठेवतो
भेसळ आम्हाला आवडत नाही


प्रत्येकानेच आपला आपला
जसा घ्यायचा असतो श्वास
तसा प्रत्येकाने आपला आपला
सांभाळांयाचा आपला आपला ग्लास



या कविता माझ्या नाहीत
मला त्या आवडल्या म्हणुन पोस्ट केल्या

Wednesday, July 23, 2008

मिलिंद गुणाजीची मला आवडलेली कविता

नभ दाटून बरसे
ओली झुळूक सुकवी
ओली पाती गवताची
माळ मोत्याची बनवी


ओला सुवास मातीचा
अंग शहारून जाई
फूल पाहून ओलेती
मन पाखराचे होई


ओला भिजलेला शब्द
ओली आठवण येई
येई कढ अनावर

ओले मन उतू जाई

ओल्या लाकडाचा धुर
मन धुमसत राही
आग आग पावसात
साथ भिंत ओली देई


मिलिंद गुणाजी
' मन पाखराचे होई '
काव्यसंग्रहातून

Tuesday, July 22, 2008

माझी पहिली पोस्ट

शब्द लगेच दिसत नाहीत
त्यासाठी , दु:ख थोड कमी व्हाव लागत
दिवसभर ते पेरल जात
रात्री रातराणीसारख उमलून येत
त्या सुगंधात सार सार सुसह्य होत