Wednesday, July 23, 2008

मिलिंद गुणाजीची मला आवडलेली कविता

नभ दाटून बरसे
ओली झुळूक सुकवी
ओली पाती गवताची
माळ मोत्याची बनवी


ओला सुवास मातीचा
अंग शहारून जाई
फूल पाहून ओलेती
मन पाखराचे होई


ओला भिजलेला शब्द
ओली आठवण येई
येई कढ अनावर

ओले मन उतू जाई

ओल्या लाकडाचा धुर
मन धुमसत राही
आग आग पावसात
साथ भिंत ओली देई


मिलिंद गुणाजी
' मन पाखराचे होई '
काव्यसंग्रहातून

No comments: