Wednesday, August 6, 2008

शब्द आले ओघळुन

मिलिंद गुणाजी हा हिन्दी सिनेमात आलेला एक मराठी नट म्हणुन मला माहित होता
त्याच माझी भटकंती सुद्धा मी नंतर वाचल होत पण तो इतक्या छान कविता करतो हे मला माहित नव्हते

शब्द आले ओघळुन
धुकट खिडकीच्या तळाशी
उभट रेषा आठवांच्या
रेंगाळ्ती काचेवरी

दिसले पुराणे गाव मज
हळूवार रेषांपलिकडे
साचलेले शब्द हळवे
नाव त्याचे शोधिती

गाव, रस्ते, वळण, चेहरे
फेर धरिती भोवती
धूसर स्मृतींना ये उजाळा
स्वप्न होई रात ती

शब्द गेले ओघळूनी
फिकट रेषा लोपल्या
बाहेर रिपरिप थांबली
अन रिमझिम वाढली


मिलिंद गुणाजी
' मन पाखराचे होई '
काव्यसंग्रहातून

No comments: