Wednesday, August 20, 2008

गुलाब

या जगात सगळच , बाहेरून सुंदर दिसत
प्रत्यक्षात मात्र गुणी ,फारच थोड असत

सुंदर आणि गुणी अस , जगात एकच असत
ते म्हणजे सुंदर , गुलाबाच फुल असत

काट्यावर उभ राहूनही, सतत सारख हसत असत
दुसर्याच्या आनंदासाठी , खुप खुप फुलत असत

निस्वार्थी निरागस अस , मोहक त्याच रूप असत
'प्रेम ' व्यक्त करताना , म्हणुनच ते प्रतिक असत

सर्वांमध्ये त्याला , राजाच स्थान असत
म्हणुनच डौलात ते , वार्यावरती डोलत असत

जितक सुंदर जितक मोहक , तितकच ते खट्याळ असत
काट्याशिवाय हाताला , सहज अस लाभत नसत

देवाच्या देव्हारयात त्याला , मानाच स्थान असत
आपल्याजवळ असत तेंव्हा , आपला ते मान राखत

एक दिवसाच्या आयुष्यात , खुप काही शिकवून जात
स्वत: काहीच न घेता , खुप काही देउन जात



स्वप्नयोगी

1 comment:

Unknown said...

I did not mention the film Mukta here since this is not my main blogpage. I mostly write at manogat.com or yahoo 360. I just save the data here so that in case of accident, I should not lose it.

Anyway, I'll take care henceforth.